Pune News : पुणे : पुण्यातील सर्वात जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक असलेल्या आंदेकर टोळीने पुन्हा एकदा नाना पेठ परिसरात धुमाकुळ घातला आहे. आंदेकर टोळी गेली २५ वर्षे पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून, प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनप्रकरणी बंडू आंदेकर याला शिक्षाही झाली होती. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील सराईतांनी दोघांवर शस्त्राने वार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा साथीदारांना अटक करण्यात आली. याप्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तीन अल्पवयीनही पोलिसांच्या ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात निखिल आखाडे (वय २९ रा. आंबेगाव पठार, धनकवडी) गंभीर जखमी झाला. (Pune News ) त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय २७) जखमी झाला आहे. दुधभाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, दुधभाते याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर (वय ६७, रा. नाना पेठ), कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय ३३), तुषार निलंजय वाडेकर (वय २४), स्वराज निलंजय वाडेकर (वय २०), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान यांना अटक करण्यात आली आहे. (Pune News ) तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुण्यातील नाना पेठे परिसरात बंडू आंदेकर आणि सूरज ठोंबरे या दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते हे ठोंबरे याचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे मित्र आहेत. (Pune News ) सोमवारी (ता. २) सायंकाळी आखाडे आणि दुधभाते गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे जात असताना आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.
हल्ल्याच्या घटनेत आखाडे आणि दुधभाते गंभीर जखमी झाले. (Pune News ) उपचारादरम्यान आखाडे याचा मृत्यू झाला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ माने आणि पथकाने आरोपींना अटक केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ग्रामसेविकेला मारहाण करून नोटीस फाडली; महिलेला २५ हजार रुपये दंडासह एक वर्ष सक्तमजुरी