Pune News : पुणे : इमारतीचे काम सुरु असताना डोक्यात सळई पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील मांजरी येथे घडली. याप्रकरणी ठेकेदाराला जबाबदार धरत हडपसर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल
विठ्ठल गडदे (वय २९, रा. शेवाळवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर अशोक किशन शिंदे (वय ५५, रा. काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. (Pune News ) याप्रकरणी विठ्ठल गडदे यांची पत्नी वर्षा विठ्ठी गडदे (रा. शेवाळवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक शिंदे याच्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२८ ऑगस्टला घडली होती घटना
मांजरी येथील मांजराई व्हिलेज येथे २८ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली होती. विठ्ठल गडदे हे मांजराई व्हिलेज येथे इमारतीचे काम करत होते. (Pune News ) तेथे काम करणारे ठेकेदार अशोक शिंदे यांनी बांधकामासाठी तिसर्या माळ्यावर लोखंडी सळया ठेवल्या होत्या. विठ्ठल गडदे यांना कामावर असताना हेल्मेट पुरवले नव्हते. नेमकं त्याचवेळी डोक्यात सळई पडल्याने झालेल्या अपघातात गडदे यांचा मृत्यू झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : स्वस्तातील आयफोनच्या आमिषाला पोलीस हवालदारच पडले बळी
Pune News : बेकायदा पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणार्याला सापळा रचून अटक