Pune News पुणे : अपघातात जखमी झालेली ५२ वर्षीय महिला उपचारादरम्यान ब्रेन डेड झाल्यावर नातेवाईकांनी अवयादनाचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
सिंहगड रास्ता परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिला खानावळ चालवून कुटुंब चालवत होती. तिच्या रस्तात अपघात झाला होता. तिला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
त्यानंतर महिलेच्या पतीने तिचे अवयवदान करण्यास तयारी दर्शवली. यानंतर तिची एक किडनी पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, दुसरी किडनी आणि यकृत सह्याद्री हॉस्पिटलला देण्यात आले, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
दरम्यान, यकृत आणि दोन्ही किडनी दान करण्यात आले. हे तीनही अवयव गरज असलेल्या रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आल्याने त्यामुळे तीन जणांचे जीव वाचले आहेत. हे अवयवदान १२ एप्रिल रोजी पार पडले. पुणे झेडटीसीसीचे हे यावर्षीचे १३ वे अवयवदान होते. तसेच यावर्षी हे ३२ वे ट्रान्सप्लांट झाले आहे.