Pune News : पुणे : विजयादशमीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांच्या सभा गाजतात. यंदा विजयादशमीच्या मुहूर्तावर शरद पवार यांची पुण्यात सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला दसऱ्यापासून सुरुवात होणार आहे. या निमित्ताने शरद पवार यांची सभा होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सभेच्या नियोजनाला सुरूवात झाल्याचे कळत आहे.
सभेच्या नियोजनाला सुरूवात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा होत असतानाच पुण्यातील सभेचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे.(Pune News) विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, २४ ऑक्टोबरपासून पुण्यातून या यात्रेला प्रारंभ होणार आहे, तर नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सभा होणार असून, नागपूर येथील समारोपाची सभा देखील शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेदरम्यान ८२० किलोमीटर लांबीची पदयात्रा काढणार आहेत. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमधून या यात्रेचा प्रवास होणार असून, तब्बल ४५ दिवसांच्या या यात्रेत युवकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या पदयात्रेचे आयोजक आमदार रोहित पवार याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, पदयात्रेमध्ये विशेषतः तरुणांच्या समस्या जाणून घेणे आणि सोडविणे, यावर भर देण्यात येणार आहे. कंत्राटी भरती पद्धत रद्द करावी, तलाठी भरतीसाठी घेतलेले शुल्क परत करावे, (Pune News) शाळा दत्तक अध्यादेश रद्द करावा, अनेक उद्योग राज्यात आणावेत, अशा मागण्या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चिमुकलीच्या तोंडावर लघुशंका करुन विनयभंग; नऱ्हेगावातील घटना
Pune News : रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा श्वानाची कमाल; पकडली ३२ किलो गांजाची तस्करी
Pune News : पिरंगुट येथे सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू