Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना, तुमचा लवकरच दाभोळकर करू… अशी धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यामधून एका तरुणाला अटक केली आहे. सागर बर्वे असं या तरुणाचं नाव असून, तो आयटी इंजिनियर असल्याची माहिती समोर येत आहे. (Who is Sagar Barve who threatened Sharad Pawar? Important information revealed in the police investigation!)
एका सॉफ्टवेअर कंपनीचा कर्मचारी
सागरला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असून, त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सागर बर्वे हा एका सॉफ्टवेअर कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. (Pune News) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुक पोस्टद्वारे धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बर्वे यानं नर्मदाबाई पटवर्धन या अकाउंटवरून ही पोस्ट केली होती. पवारांना नरेंद्र दाभोळकर यांच्याप्रमाणे मारलं जाईल, अशी ती पोस्ट होती. या पोस्टविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं एफआयआर दाखल केला होता. तसेच सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
अखेर या प्रकरणात पुण्यातून सागर बर्वे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Pune News) तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. दरम्यान, शरद पवार आणि संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून
Pune News : पुण्यात पत्रकारावर गोळीबार, १५ दिवसांपूर्वीच झाला होता हल्ला
Pune News : आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट : पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे