राजगुरुनगर, (पुणे) : Pune News – पडक्या घराची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मूत्यू झाल्याची दुदैवी घटना राजगुरुनगर शहरातील आझाद चौक येथे रविवारी (ता. १६) घडली आहे. (Pune News)
मृतांची नावे खालीलप्रमाणे
विजय वाडेकर (रा. चांडोली ता. खेड) सुनिल पांचाळ (मुळ गांव लातुर सध्या रा.खेड ) अशी या घटनेत मुत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्रील गोडसे यांच्या जुने पडक्या घराची भिंत पाडण्याचे काम विजय वाडेकर व सुनिल पांचाळ या दोन मजुरांनी घेतले होते. संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास अचानक मातीची भिंत कोसळली. या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात विजय वाडेकर पुर्ण पणे गाडला गेला. सुनिल पांचाळ यांच्या अंगावर विटा माती, दगड लाकडी तुळया पडल्या.
दरम्यान, या घटनेची माहिती खेड पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी जाऊन नागरिक व जेसीबीच्या मदतीने मातीचा ढिगारा बाजुला करून विजय वाडेकर यांचा मृतदेह बाहेर काढला. सुनिल पांचाळ यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा :
Chikhali News : आईच्या डोळ्यादेखत भिंत पडून मुलाचा मृत्यू; मुलाची ‘ती’ ईच्छा राहिली अपूर्णच…!