युनूस तांबोळी
Pune News : पुणे : कांदा व टोमॅटोचे दर कमी झाल्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर व राजगुरूनगर येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत योग्य उपाययोजना करावी, या मागणीसाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडाळे यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसह पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी
फेब्रवारी व मार्च महिन्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान रखडल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्नर बाजार समितीचे ७ कोटी तर मंचर बाजार समिती अंतर्गत ११.५० कोटी अनुदान मिळणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारने कांदा २४१० रूपये क्विंटलने खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत त्या बाजारभावाने कांदा खरेदी केलेला नाही. (Pune News) यापुढे कांदा ४ हजार रूपये क्विंटलने खरेदी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांचा ६० टक्के कांदा, कांदा चाळीत पडून आहे. या खरेदीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही सांगण्यात आले आहे. कांद्यावरील ४० टक्के शुल्क रद्द करण्यात यावे. त्या पाठोपाठ कायमस्वरूपी कांदा निर्यात धोरण स्विकारण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, जुलै महिन्यात टोमॅटोचे दर वाढले होते. त्यावेळी केंद्र सरकारने ११० रूपये प्रति किलो दराने टोमॅटो खरेदी केला होता. त्यातून ग्राहकांना ८० रूपये दराने कांदा उपलब्ध करून दिला. सध्या मात्र ४ ते ७ रूपये दराने टोमॅटो खरेदी केला जात आहे. हा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून, बाजाराअभावी टोमॅटोच्या बागा सोडून दिल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून केंद्र व राज्य सरकाने ३० रूपये किलो दराने कांदा खरेदी करावी. कायमस्वरूपी कांदा निर्यात धोरण स्विकारावे. (Pune News) अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी निवेदनात केली आहे.
या वेळी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे, अंबादास हांडे, जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे सचीन थोरवे, युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे, रमेश शिंदे, रामभाऊ वाळुंज, संदेश खंडागळे, रोहिदास लोखंडे, संजय बढेकर, विशाल वाबळे, रोहिदास खंडागळे, गणेश पवार, बाबाजी भोर, लहू मुळे आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : डोक्यात धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून, हडपसरमध्ये तरुणाचा निघृण खून
Pune News : उसने दिलेले १० हजार परत मागितले; पीएमपीएल चालकाचा मित्रांनीच केला निघृण खून