Pune News : पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी (ता. २४) संपली. मात्र, अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलना पाठिंबा म्हणून दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतीतील तिघांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक
मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आंदालनाचे आता राजकीय पडसादही आता उमटू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातही मराठा आरक्षणाचे लोन पसरत असून, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कानगाव ग्रामपंचायतीतील तिघांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.(Pune News) हा राजीनामा कानगावच्या सरपंचांकडे सुपूर्द केला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरक्षण देण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा राजीनामा देत असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.
खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाची पुढची दिशा ठरली आहे. एमआयडीसी परिसरात जाणाऱ्या सर्व मार्गांवरील बस रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षण दिले नाही तर २५ तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. (Pune News) त्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाकडून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या बस रोखल्या गेल्या आहेत. मोशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, पुण्यात थोड्याच वेळात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद घेणार आहे. (Pune News) मराठा क्रांती मोर्चा करणार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बारामतीच्या रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा परवाना निलंबित; सलग अपघातानंतर मोठी कारवाई
Pune News : अजित पवारांच्या सभेत मराठा समाजाचा आक्रोष; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी
Pune News : युवकांच्या प्रश्नासाठी रोहित पवार सरसावले; युवा संघर्ष पदयात्रेला प्रारंभ