Pune News : पुणे : ड्रग्स माफीया ललित पाटील तीन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या उपचार कक्षातून (वाॅर्ड क्रमांक १६) फरार झाल्यानंतर रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची दररोज तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. रात्रपाळीत गस्तीवर असलेले पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्तांनी ससूनमधील उपचार कक्षाची अचानक तपासणी करावी, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्तांचे आदेश
ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवणारा ललित पाटील बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पुणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला आहे. (Pune News) पाटील ससून रुग्णालयातील उपाचर कक्षात मोबाइल संच वापरत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. पाटील जून २०२३ पासून विविध आजार झाल्याचे सांगून ससूनमधील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. तो पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.
पाटील पसार झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाॅर्ड क्रमांक १६ ची अचानक तपासणी करण्याचे आदेश रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Pune News) वाॅर्डची तपासणी करुन त्याची नोंद ठेवावी, तसेच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित चौकशी करावी, असे आदेशात म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर शिवले प्रथम..