Pune News : पुणे : पिंपरी-चिंचवड, नगर, सोलापूरसह राज्यात ८ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालये होणार आहेत. यामुळे नागरिकांना या कार्यालयांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
शासन निर्णय जारी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालये प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये रूपांतरित करण्यासंदर्भातील आदेश शासनाने काही दिवसांपूर्वी जारी केला. त्यामुळे राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. (Pune News)
परिणामी, दर्जा वाढलेल्या कार्यालयांचा प्रमुख (प्रादेशिक परिवहन अधिकारी) म्हणून काम करण्यासाठी आता ९ डेप्युटी आरटीओंच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, राज्य शासनाने यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून या शासन निर्णयाची प्रतीक्षा होती. (Pune News) हा निर्णय झाल्यामुळे आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच डेप्युटी आरटीओंना दिलासा मिळाला आहे.
नऊ प्रादेशिक परिवहन कार्यालये होणारी ठिकाणे पुढीलप्रमाणे..
पिंपरी -चिंचवड, अकोला, अहमदनगर, जळगाव, वसई (जि. पालघर) सोलापूर, चंद्रपूर, बोरिवली (मुंबई), सातारा
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : फक्त आरशावरील रेडियम आणि रिबीनवरून पोलीस हवालदाराने ‘असा’ घेतला आरोपीचा शोध
Pune News : येरवडा कारागृहात कैद्यांकडे सापडला मोबाईल फोन ; सात कैद्यांवर गुन्हा दाखल