Pune News पुणे : पैंजण या दागिन्याला आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. अनेक भारतीय महिला पैंजण आवडीने घालतात. अगदी पूर्वीपासून लहान बाळ ते अगदी मोठ्या महिलांपर्यंत पायात चांदीचे पैंजण घालण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीनुसार जे सोळा श्रृंगार सांगितले आहेत, त्यातील एक महत्वाचा दागिना म्हणजे पैंजण. यंदाच्या अधिक महिन्यात भारतीय संस्कृतीमधील या सुरेख दागिन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने पुण्यात तब्बल १० किलो वजनाचे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे चांदीचे पैंजण तयार करण्यात आले आहे. रांका ज्वेलर्स यांनी तब्बल १० किलो वजनाचे सर्वांत मोठे चांदीचे पैंजण घडविले आहेत. ५ कारागिरांनी दिवस-रात्र २ महिने यासाठी मेहनत घेतली आहे.
रांका ज्वेलर्स यांनी केली निर्मिती
पुण्यातले ज्वेलर्स तेजपाल रांका यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दागिन्यामध्ये सेमी प्रेशिअस स्टोनचा वापर करण्यात आलेला असून, याची किंमत 8 लाख ५० हजार रुपये इतकी आहे. (Pune News ) ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी पैंजण असल्याचे मानले जाते. अधिक महिन्याच्या निमित्ताने दहा किलो वजनाची ही पैंजण बनवली आहे. नव्या पिढीला आपली संस्कती समजावी, यासाठी त्यांच्यासमोर एक वेगळी वस्तू आम्ही घेऊन आलो आहोत.
रांका ज्वेलर्सच्या पिंपरी चिंचवड आणि बंडगार्डन येथील दालनांमध्ये पैंजण प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. (Pune News ) सर्वांनी आवर्जून ही पैंजण पाहण्यासाठी यावे, असे आवाहन रांका ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांनो सावधान! शहरात डेंग्यूनंतर चिकुनगुन्याचाही शिरकाव; अशी घ्या काळजी!
Pune News : रिक्षा चालकाने दोन साथीदारांसह इंजिनिअरचे दीड लाख लुटले ; कात्रज परिसरातील घटना..
Pune News : रिक्षा चालकाने दोन साथीदारांसह इंजिनिअरचे दीड लाख लुटले ; कात्रज परिसरातील घटना..