Pune News : पुणे : शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकतीच औंध परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. एका रोडरोमिओच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने चक्क गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चतु:शृंगी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चतु:शृंगी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर कांबळे (वय २८, रा. डी. पी. रस्ता, ओैंध) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News ) संबंधित मुलगी शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत असे. काही दिवस हा प्रकार केल्यानंतर त्याने या शाळकरी मुलीची छायाचित्रे काढली आणि सोशल मिडीयावर व्हायरल केली. ही छायाचित्रे व्हायरल करताना मुलीचा उल्लेख करत फोटोवर ‘माझी बायको’ असा मेसेज लिहिला. छायाचित्रे व्हायरल झाल्यामंळे मुलीला संताप अनावर झाला.
दरम्यान, आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Pune News ) दरम्यान, ही गोष्ट कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला धीर दिला. समजावून सांगितले. त्यावेळी वस्तुस्थिती मुलीने सर्वांना सांगितली. आरोपीच्या त्रासामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा; सख्ख्या बापाकडून मुलीचा विनयभंग; नराधमावर गुन्हा दाखल