Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चारचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांची गौरवास्पद कामगिरी; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 16:23

Pune News  : पुणे : शहरात वाहनचोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक फॉर्च्यूनर कार चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना महागड्या चारचाकी गाड्या चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात यश आले. पोलिसांनी या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या कारसह ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच वाहन चोरीचे दोन गुन्हे देखील उघडकीस आणले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने टोळीला बेड्या ठोकण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात हद्दीतून फॉर्च्यूनर गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार संदीप येळे आणि अमोल सरतापे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. (Pune News) यावरून आरोपींचा माग काढत ताब्यात घेतले. चौकशी केली असता, या गुन्ह्यामध्ये स्थानिक सराईत गुन्हेगाराचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गोरक्षनाथ साळवे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी डिव्हाइसच्या मदतीने बनावट चावी तयार करुन कारची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मनोज महेंद्र परिहार, राजेश राधेश्याम पंडित, इस्माईल शेफरखान (सर्व रा. आग्रा, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरामध्ये वाहन चोरी करण्यास मदत करणाऱ्या गोरक्षनाथ साहेबराव साळवे (रा. काळेवाडी फाटा, रहाटणी, पुणे) याला अटक केली आहे. (Pune News) अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर नोएडा येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. साळवे हा देखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडून लोणीकंद आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यानंतर आरोपींकडून फॉर्च्युनर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील इनोव्हा क्रिस्टा कार, तीन डोंगल, दीड लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक्स चावी तयार करण्याचे पॅड, तीन मोबाईल, असा एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे डिव्हाईसच्या साह्याने प्रोग्रॅम चोरून जागीच डूप्लीकेट चावी तयार करून वाहन चोरी करत होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Pune News)वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक पाडवी, अंमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, अमोल सरतापे, संदीप येळे, विनायक येवले यांच्या पथकाने केली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पर्यावरणस्नेही पुणेकर आजींचा ८० व्या वर्षी सायकल प्रवास; व्हायरल व्हिडीओनंतर कौतुकाचा वर्षाव!

Pune News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा; सख्ख्या बापाकडून मुलीचा विनयभंग; नराधमावर गुन्हा दाखल

Pune News : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग; एकाला अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

Pune News : संतापजनक! रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp