Pune News : पुणे : बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला (वय ९१ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला आणि नात सना वैद्य असा परिवार आहे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सक्रिय असणारे आणि बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत.
परिवर्तनवादी संस्थांच्या कार्यात होता सहभाग
एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे डॉ. झैनब पूनावाला यांचे पार्थिव सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सामाजिक कृतज्ञता निधीचे विश्वस्त डॉ. बाबा आढाव, अन्वर राजन आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे, डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. (Pune News) पूनावाला यांच्या अंतिम इच्छेनुसार देहदान करण्यात आले. वैद्यकीय संशोधनासाठी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आला.
बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीत डॉ. झैनब यांनी ताहेरभाई यांच्यासमवेत उल्लेखनीय काम केले. बोहरा समाजाने त्यांच्यावर बहिष्कारही घातला, तरी दोघेही काम करत राहिले. ‘या बहिष्कारामुळे मोठे जग पाहता आले’, असे ताहेरभाई नेहमी सांगायचे. (Pune News) सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी यांसह विविध परिवर्तनवादी संस्थांच्या कार्यातही त्या दोघांचा सक्रिय सहभाग होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ताथवडे शहरात एकापाठोपाठ तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, ३ स्कूल बस जळाल्या