Pune News : पुणे : युवा संघर्ष यात्रेदरम्यान सणसवाडी येथे कोपरा सभा घेत आमदार रोहित पवार यांनी महागाई, बेरोजगार, कंत्राटी भरती तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुती सरकारला फटकारले.
मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा
पुणे ते नागपूर या सुमारे ८०० किलोमीटरच्या पायी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने वाडया-वस्त्यांसह रस्त्याने भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधत नागपूर याठिकाणी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.(Pune News) जनतेचा आवाज बहिऱ्या सरकारपर्यंत पोहचवणार हा विडा एका मराठ्याने उचलला आहे. मराठे कधीच मागे हटत नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत एक दिवशीय अन्न त्याग करत पदयात्रा काढणार असण्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महाराष्ट्राने एक गोड आवाजाचा नादब्रह्म कायमचा गमावला : ह.भ.प. पंकज महाराज गावडे
Pune News : हडपसरमध्ये धारदार शस्त्रांनी २२ वाहनांची तोडफोड; तिघांना अटक
Pune News : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर