अमिन मुलाणी
Pune News : सविंदणे, (पुणे) : मिशन २०२४ अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेली जनस्वराज्य यात्रा शिरूर लोकसभा मतदारसंघात शनिवारी (ता. १६) सकाळी ८ वाजता शिवजन्मभूमी शिवनेरी येथून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा प्रभारी सचिन गुरव यांनी दिली.
जनस्वराज्य यात्रा..
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी येथे दर्शन घेऊन यात्रा सुरू होणार आहे. हि यात्रा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर सहभागी होणार आहे.
हि यात्रा जुन्नर, नारायणगाव, मंचर, अवसरी, निरगुडसर, पारगाव शिंगवे, लाखनगाव, पोंदेवाडी, धामणी, लोणी, वाफगाव मार्गे खेड राजगुरुनगर, चाकण, भोसरी, दिघी, येरवडा, हडपसर, उंड्री, लोणी काळभोर तसेच रविवारी (ता. १७) थेऊर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, तरडे, शिंदवणे, वळती, उरुळी कांचन, खामगाव टेक, दत्तवाडी, भवरापूर, हिंगणगाव, शिंदेवाडी, अष्टापूर, पिंपरी बुर्केगाव, डोंगरगाव, वाडेबोल्हाई, केसनंद, लोणीकंद, पेरणेफाटा वरून शिरूर तालुक्यात प्रवेश करणार आहे.
कोरेगाव भिमा, वढू, केंदुर, चौफुला, पिंपळे जगताप, शिक्रापूर, वाघाळे, मलठण, आमदाबाद, कर्डीलवाडी, शिरूर, गोलेगाव, चव्हाणवाडी, निमोणे, निर्वी, न्हावरे येथे सांगता सभा होणार आहे.
दरम्यान, या पत्रकार परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्र अनुसुचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष गणेश लोंढे, संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, शहर सचिव राजेश लवटे, शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, हडपसर विधानसभा अध्यक्ष बिभीषण देवकुळे, जुन्नर तालुका अध्यक्ष भाऊ घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष योगेश धरम, खेड तालुका अध्यक्ष अण्णासाहेब नरूटे, हवेली तालुका अध्यक्ष भरत गडदे उपस्थित होते.