Pune News : पुणे : डेक्कन ते नदीपात्र प्रवास करण्यासाठीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे पुण्यातील बाबा भिडे पूल. मुठेला पूर आल्यावर सर्वप्रथम पाण्याखाली जातो, तो भिडे पूल… भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुण्यात पाऊस पडला, असे पुणेकर मानतच नाहीत. ना.सी. फडके, सुहास शिरवळकरांच्या कादंबऱ्यांमध्ये डोकावणारा पुणेकरांचा लाडका ऐतिहासिक भिडे पूल पुढील तब्बल दोन महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
भिडे पूल परिसरात पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु होणार
भिडे पूल परिसरामध्ये मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भिडे पूल परिसरात पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु होणार आहे. (Pune News) त्यामुळे हा पूल आता दोन महिने पुणेकरांना वापरता येणार नाही. यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन महिने पुणेकरांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
भिडे पूल बंद झाल्यास वाहनचालकांना वळसा घालून जावे लागणार आहे. डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (ता. १६ ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे १५ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. (Pune News) गरज असल्यास केळकर रस्ता मार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पूल बंद असल्याने केळकर रस्ता मार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे, तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्ता मार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा म्हणजेच झेड ब्रिजचा वापर करावा. (Pune News) भिडे पूल, सुकांता हॉटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. असे आवाहन वाहतुक विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच; सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला
Pune News :आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवणारा आरोपी ताब्यात; 1 कोटी ८० लाखाची फसवणूक