Pune News : पुणे : सलग सुट्या त्यात सणासुदीचा काळ यामुळे पुण्याहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. एरव्ही पुणे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी नसते. पण सणासुदीचा काळ असल्याने ही गर्दी पाहायला मिळत आहे. फलाट क्रमांक एक तर प्रवाशांनी भरला होता. पाय ठेवायला पण जागा नव्हती.
प्रवाशांची संख्या वाढली
वाढती प्रवासी संख्या पाहता रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. पण त्याही तोकड्या पडत आहेत. बाहेर उन्हात थांबलेल्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. (Pune News ) अशा वेळी प्रवाशांच्या दृष्टीने सोय करणे गरजेचे आहे; पण याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न पडत आहे. सण- उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून जादा गाड्यांची मागणी जोर धरत आहे.
सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. (Pune News ) त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणखी रेल्वे गाड्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे चित्र येथील गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.
पुण्यातून शेकडो रेल्वे गाड्यांची ये-जा
पुणे रेल्वे स्थानकावरून साधारणपणे 200 च्या सुमारास गाड्यांची ये-जा होत असते. पुणे रेल्वे स्टेशनवर सहा फ्लॅटफार्म असून, पुण्यातून दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा करत असतात. त्यात सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘पीएमपीएमएल’ बस चालक व वाहकांना ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य
Pune News : आम्ही मांजरीचे भाई… म्हणत दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकरसह ५ साथीदारांवर ‘मोक्का’!