Pune News : पुणे : सप्टेंबरच्या अखेरीस मुसळधार पावसाने ठाण मांडले असतानाच, आता ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, पुणेकरांना आता ऑक्टोबर हिटचा चांगलाच अनुभव येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत असून, उकाड्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत.
उकाड्याने पुणेकर त्रस्त
यावर्षी मान्सून लवकर माघारी फिरला. पाऊस नसल्याने हवामान आता बहुतांश कोरडे झाल्यामुळे तापमानाचा पारा वाढला आहे. बुधवारी शहराचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवला गेला. (Pune News) तर त्यासोबतच कोरड्या व उष्ण हवेचे प्रमाण वाढले असून, सोबतच बाष्पोत्सर्जनाचे प्रमाणदेखील वाढल्यामुळे असह्य उकाडा जाणवत आहे.
सध्या शहरातील दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना घाम फुटत आहे. शहरात सर्वाधिक तापमानाचा पारा मगरपट्टा येथे ३४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. (Pune News) आज (ता. ५) शहरातील आकाश दुपारी निरभ्र आणि सायंकाळी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. ६) शहरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ससून रुग्णालयातून कैदी फरार झाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर
Pune News : घरगुती वादाच्या कारणातून ३४ वर्षीय तरुणाची खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या..
Pune News : पैशांच्या वादातून मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार