Pune News : पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री 10 नंतर साऊंड सिस्टीम लावुन मोठया आवाजात संगीत वाजविणार्या रेस्टॉरंट अॅन्ड बारवर कारवाई केली आहे. पोलिसांनी 4 लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम देखील जप्त केली आहे. (Police action on restaurant and bar in Yerawada-Kalyaninagar )
चार लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील काही रेस्टॉरंट अॅन्ड बारमध्ये रात्री 10 नंतर मोठया आवाजात साऊंड सिस्टीम सुरू असते. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कल्याणीनगर परिसरातील निलांजली सोसायटीतील गौरीशंकर कल्याणी बंगोल सो. ले नं. 2, सेंट्रल अॅव्हेन्यु येथील एलिफंट अॅन्ड को. रेस्टॉरंट अॅन्ड बारवर छापा टाकला. (Pune News) तेथे मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करून तेथील 4 लाख रूपये किंमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या आदेशानुसार (Pune News) आणि मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलिस अंमलदार अजय राणे, हनमंत कांबळे, अमेय रसाळ आणि अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आनंदाची बातमी! मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री; ‘या’ भागात पावसाची हजेरी
Pune News : पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये अतिरिक्त दोन द्वितीय श्रेणी चेअर कारचे डबे
Pune News : महाराष्ट्र बनले सायबर भामट्यांचे हब ; तब्बल ९०० कोटींची लूट