Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dombivali News : डोंबिवलीतील ५ वर्षीय चिमुकलीची कमाल, वडिलांसोबत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 16:00

Dombivali News : डोंबिवली  : जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर गाठायची इच्छा अनेकांच्या मनात असते. मात्र, अथक प्रयत्न करूनही प्रत्येकाचीच ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. मात्र, डोंबिवलीतील एका अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीने हे स्वप्न पाहिले आणि पूर्णत्वास देखील नेले. वडिलांसमवेत तीने जगातील उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर जाऊन अनोखी उंची गाठली आहे. (Kamal, a 5-year-old boy from Dombivli, successfully climbed Everest Base Camp with his father…)

प्रिशा निकाजू या डोंबिवलीतील पलावा फेज दोनमध्ये राहणाऱ्या अवघ्या ५ वर्षीय चिमुरडीने जगातील सर्वांत उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर जाण्याचे स्वप्न पाहिले. (Dombivali News)  त्यासाठी प्रिशा रोज ५ ते ६ मैल चालत असे. तिने दोन वर्षांची असल्यापासून ट्रेकिंग करण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर तिने सिंहगड, लोहगड, विसापूर, कर्नाळा, सोंडाई, कोथळी गड, प्रबळमाची, कलावंतीणीचा गड, रायगड असे अनेक गड लिलया सर केले आहेत. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तिने कळसूबाई शिखर सर केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रिशा एव्हरेस्ट चढाईसाठी सज्ज झाली.

प्रिशा हिने वडील लोकेश निकाजू यांच्यासोबत एव्हरेस्ट बेसकॅम्पपर्यंत जाण्याचे ठरवले. केवळ नऊ दिवसांत ती १७ हजार ५९८ फूट उंचीवर पोहचली. विशेष म्हणजे एव्हरेस्ट बेस सर करताना तिला कोणताही त्रास झाला नाही, असे तिचे वडील लोकेश निकाजू यांनी सांगितले. तिला कराटे, टेबल टेनिस, पोहणे आवडते. त्यामुळे ती सतत या सर्व खेळांचा सराव करत असते, असे तिची आई सीमा निकजू सांगतात. (Dombivali News) ज्या वयात लहान मुलं खेळण्यात, दंगामस्ती करण्यात गुंग असतात, त्याच वयात प्रिशाने एव्हरेस्ट चढण्याचा निर्धार केला, आणि ती उंची गाठली.

 

प्रिशाचे वडील लोकेश निकाजू यांना ट्रेकिंगची आवड आहे. दर शनिवार-रविवार ते प्रिशाला घेऊन ट्रेकिंगला जात असल्याचे ते सांगतात. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियारींग अँड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेचे ते माजी प्रशिक्षणार्थी आहेत. त्यामुळे ते स्वतः प्रिशाला मार्गदर्शन करतात.

अशी गाठली एव्हरेस्टची उंची…

प्रिशा व तिचे वडील लोकेश निकाजू यांनी २४ जून रोजी नेपाळमधील लुकला या ठिकाणाहून ट्रेकिंग सुरु केली. ६ तास ट्रेकिंग करत ते फाकडिंग याठिकाणी पोहचले. तेथे रात्री आराम केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता ट्रेकिंग सुरू केलं. सायंकाळी ७ वाजता म्हणजे ११ तासांची ट्रेकिंग करून नामचे बजार या ठिकाणी पोहोचले.(Dombivali News)  त्यानंतर तिसऱ्या दिवशी टेंगबोचे आणि चौथ्या दिवशी टेंगबोचे ते डेबूचे, पाचव्या दिवशी डिंगबोचे येथे पोहचले. सहाव्या दिवशी त्या ठिकाणीच मुक्काम केला. सातव्या दिवशी त्यांनी डिंगबोचेपासून आपला प्रवास सुरु केला. लोबूचे या ठिकाणी प्रवास करत त्याच ठिकाणी आठव्या दिवशी मुक्काम केला आणि अखेर शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी लोबूचे ते एव्हरेस्टचा बेस कॅम्प प्रवास करत जमिनीपासून 17 हजार 598 फूट उंची गाठली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : ना सुरक्षारक्षक, ना कार्यकर्त्यांचा लवाजमा… सर्वत्र मंत्री गिरीश महाजनांच्या एकट्याने प्रवासाची चर्चा!

Mumbai News : शिवसेनेला विभागून तुम्ही शिंदे गटाला मांडीवर का घेतलं?… संजय राऊत यांचा अमित शाह यांनाच प्रतिप्रश्न!

Mumbai News : रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Loni Kalbhor News : अभिमानास्पद : लोणी काळभोर येथील खेळाडू सेजल सिंगने इतिहास रचला, आशियाई साँबो स्पर्धेत पटकाविले कांस्य पदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.