Pune News : पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. मोटारचालकाने पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमोल लोंढे (वय २०, रा. संकेत विहार, हडपसर) असे गुहा दाखल केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. (Pune News ) याबाबत पीएमपी चालक तुषार डोंबाळे (वय ३५, रा. सोरटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हडपसर भागातील संकेत विहार सोसायटीसमोर मोटारचालक लोंढे याने अचानक मोटार बससमोर थांबवली. बस मागे घे, असे सांगून लोंढेने पीएमपी चालक डोंबाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोंढे पीएमपी बसमध्ये शिरला.(Pune News ) त्याने पीएमपीचालक डोंबाळे यांना मारहाण केली. डोंबाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुशील डमरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कन्स्ट्रक्शन कंपनीची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
Pune News : अटकेतील उबाळे टोळीविरोधात अजून एक गुन्हा दाखल
Pune News : वाचन चळवळीला गती देण्यासाठी मुंबईत परिसंवाद; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव मुख्य अतिथी