Pune News : पुणे : रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सध्या रेल्वे प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात आहे. पुणे विभागात सप्टेंबर महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान तब्बल १७ हजार ६२२ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले असून, या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ४२ लाख १७ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर बुक न करताच सामान घेऊन जाणाऱ्या १५६ प्रवाशांकडून २७ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने (Pune News)आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वात, तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
यापुढे रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम वारंवार राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, (Pune News) अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे विद्यापीठात साकारतेय अमृत उद्यान
Pune News : कोरेगाव पार्क, मुंढवा येरवडा भागात जड वाहनांना बंदी