Pune News : पुणे : आता मोठा बॉम्ब फुटेल… असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवेळी म्हणतात; परंतु असे कधीही होत नसते. मात्र, त्यावेळी पुढे काहीतरी नियोजित असण्याची दाट शक्यता असते. भविष्यात घडणाऱ्या घटनांची ती नांदी असते, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ओबीसी तसेच मराठा आरक्षणाबाबत अद्याप योग्य निर्णय घेण्यात आलेला नाही. आरक्षणाचे भिजत घोंगडे आहे, याचाच अर्थ भाजप आरक्षणाबाबत राजकारण करत आहे. धनगर आरक्षणाबाबातदेखील भाजपची हीच भूमिका आहे. (Pune News ) केंद्रात भाजप सरकार असल्याने, एखादा प्रश्न मुळापासून सोडवण्याची संधी भाजपच्या खासदारांना आहे. मात्र, प्रश्न अनुत्तरित ठेवण्यातच भाजपचे हित असते. भाजपचे केंद्रात एक इंजिन आणि तीन इंजिन राज्यात आहेत. ठरवल्यास ते अनेक गंभीर प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतात. जनतेला योग्य न्यायही देऊ शकतात; मात्र, भाजपला समाजात दुफळी माजवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरुस्ती करून तातडीने १०० टक्के आरक्षण दिले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. संसदेत मुद्दे मांडले गेले पाहिजेत. (Pune News ) मराठा समाजाला विश्वासात घेऊन, योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल आणि कोणावरही अन्याय न करता हा निर्णय घ्यायचा असेल तर घटना दुरुस्तीशिवाय पर्याय नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
ललित पाटील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे
आजवर अनेक घटनांचे तपास कालांतराने मागे पडले आहेत. यासाठी ललित पाटील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे, अशी आग्रही मागणी रोहित पवार यांनी केली. त्यासाठी त्यांनी मागील ३० वर्षांत मागे पडलेल्या तपासांचा आढावा घेतला. (Pune News ) जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान लाठीचार्ज नेमका कोणी केला, याचे उत्तर जनतेला अद्याप मिळालेले नाही. हळूहळू हा तपास मागे पडला. असे अनेक तपास आजवर मागे पडले आहेत, असे सांगून सरकारी माध्यमातून तपास करण्यापेक्षा न्यायालयीन चौकशी करावी. अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शालेय पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News : काकूला धमकावून पुतण्याने केला बलात्कार; पैसेही उकळले; गुन्हा दाखल
Pune News : पुण्यातील रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार..