Pune News : पुणे : पुण्यात प्रथमच ‘थर्ड रेल प्रणाली’ या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर पुणे मेट्रोत केला जाणार आहे. यामुळे पुणेरी मेट्रो हा पुणे शहराला अत्याधुनिक अशी ‘थर्ड रेल’ प्रणाली उपलब्ध करून देणारा पहिला प्रकल्प ठरणार आहे. ‘थर्ड रेल’ प्रणालीचा अवलंब केल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोला रुळांच्या शेजारून आणि खालून विद्युतपुरवठा केला जाईल. यामुळे मेट्रोच्या वर विद्युत तारांचे जाळे असेल ना रुळावर विजेचे खांब. या मेट्रोमुळे पुण्याच्या सौंदर्य़ात भर पडणार आहे. या प्रणालीमुळे शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील दुसरी मेट्रो वायरलेस होणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील दुसरी मेट्रो वायरलेस होणार
पारंपरिक ओव्हरहेड उपकरण प्रणालींपेक्षा हे तंत्रज्ञान वेगळे असून, पक्षी किंवा पतंग तारांमध्ये अडकून मेट्रोच्या विद्युतपुरवठ्याला होऊ शकणाऱ्या संभाव्य अडथळ्याला या प्रणालीमध्ये वाव राहत नाही, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली. (Pune News) ‘थर्ड रेल प्रणाली’च्या वापरा संबंधीच्या करारावर ठेकेदार कंपनी व राज्य सरकारमध्ये नुकताच करार झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारने मंजुरी दिली आहे. परदेशामध्ये आता सर्व मेट्रो याच तंत्रज्ञानाने धावत आहेत. त्यामुळे भारतात देखील आता याचा वापर करण्यात येणार असून त्याची सुरुवात पुण्यापासून होणार आहे.
‘थर्ड रेल सिस्टीम’म्हणजे अतिरिक्त रेल्वे (ज्याला “कंडक्टर रेल” म्हणतात) वापरून ट्रेनला इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर प्रदान करण्याचे एक साधन आहे. बर्याच सिस्टीमवर, कंडक्टर रेल चालू असलेल्या रेलच्या बाहेर स्लीपरच्या टोकांवर ठेवली जाते, परंतु काही सिस्टममध्ये मध्यवर्ती कंडक्टर रेल वापरली जाते. (Pune News) ती मेट्रो रुळावर धावत्या दोन्ही बाजूने समांतर किंवा रुळांच्या मध्ये बसवली जाते. या प्रणालीच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा केला जातो. ‘थर्ड रेल’ प्रणालीमध्ये मेट्रोच्या नियमित दोन रुळांच्या समांतर तिसरा विशिष्ट पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेला एकेरी रूळ टाकून, त्या मेट्रो गाडीला थेट खालून ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर’ पुरविली जाते. या पद्धतीने धावणाऱ्या गाड्यांना खालच्या बाजूला विद्युत संपर्कासाठी एक खास धातूची पेटी बसवण्यात येते, तिला ‘शूज’ असे म्हटले जाते. या शूजच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्याचा पारा ३० अंशांवर; ‘ऑक्टोबर हिट’चे पुणेकरांना चटके
Pune News : ससून रुग्णालयातून कैदी फरार झाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर
Pune News : घरगुती वादाच्या कारणातून ३४ वर्षीय तरुणाची खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या..