Pune News : पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नुकतेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. मृणाल गांजाळे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत.
यंदा राज्यातील एकाच शिक्षकाला पुरस्कार
शिक्षण क्षेत्रात प्रयोगशील काम करणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येते. (Pune News) पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येते. यंदा मंत्रालयाकडून देशभरातील ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदा राज्यातील एकाच शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पाच सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे.गेली काही वर्षे राज्यातील किमान दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळत होता. (Pune News) मात्र, यंदा राज्यातील एकमेव शिक्षकाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चांगल्या परताव्याच्या आमिषाने आयटीतील महिलेसह ८ जणांची फसवणूक; गुन्हा दाखल
Pune News : बोपदेव घाटातील ट्रिनिटी महाविद्यालयाजवळ गोळीबार? तपास सुरू