Pune News : पुणे : ससून रूग्णालयातून पसार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ललित पाटीलचा चालक सचिन वाघ याने नदीत फेकलेले ड्रग्स शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा देवळा तालुक्यात आले आहे. दरम्यान, ड्रग्ससाठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने नाशिकमध्ये पाच दिवसांपासून ऑपरेशन राबवले होते. मुंबई पोलिसांच्या टीमने ४ तास स्कुबा डायव्हरच्या मदतीने अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले होते. आता पुन्हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम नाशिकमध्ये आली आहे.
मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा देवळा तालुक्यात
नाशिक जिल्ह्यातील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा नदीत फेकलेला कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने ड्रग्सचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे. १५ फूट खोल नदीपात्रात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. (Pune News) ड्रग्सच्या शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधाऱ्यातील पाणी सोडले गेले आहे. ललित पाटील याची पोलीस कोठडी सोमवारी संपणार आहे. यामुळे त्यापूर्वी माहिती जमा करण्यासाठी पोलिसांकडून तपासात गती देण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा ललित पाटील याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ललित पाटीलच्या एन्काऊंटरची चर्चा यापूर्वी देखील झाली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पोलीस कस्टडीमध्ये असणाऱ्या कोणत्याही आरोपीला धोका नसतो.(Pune News) हे आरोपी २४ तास पोलिसांच्या निगराणीमध्ये असतात. या संदर्भात सुषमा अंधारे यांच्याकडे अधिकृत माहिती असल्यास त्यांनी राज्याच्या महासंचालकांकडे द्यावी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन मुलांच्या आईने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके