Pune News : पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाचे राज्यभरातील नागरिकांप्रमाणेच परदेशी नागरिकांनादेखील आकर्षण वाटते. हजारो भाविक गणेशोत्सव काळात बाप्पांच्या दर्शनासाठी तसेच देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. गणेश उत्सव कालावधीमध्ये नागरिकांचा प्रवास सहज सुलभ होण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागामधील प्रतिष्ठित गणपती मंडळांचे अंतर व वाहनांच्या पार्किंगची सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी तयार केलेल्या ‘सारथी गणेश उत्सव गाईड २०२३’ लिंकचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे पोलिसांच्या ‘सारथी गणेश उत्सव गाईड २०२३’ लिंकचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
या वेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळांच्या ठिकाणी सातत्याने गर्दी असते. तेथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जवळच्या वाहनतळांची खात्रीशीर माहिती तसेच उत्सव काळातील बंद रस्ते, पर्यायी चालू रस्ते यांची माहिती असलेले हे गाईड बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.’सारथी गणेश उत्सव गाईड २०२३’ या गाईडच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे, वाहनतळांचा मार्ग पाहता येणार आहे.
वाहनतळ एकूण ५ शाळा, ७ कॉलेज यांचे मैदान संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहेत. (Pune News ) तसेच पार्किंगसाठी पुणे महापालिकेकडील, इतर खासगी वाहनतळ, नदीपात्र इत्यादी ठिकाणांची माहिती लोकेशनुसार उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
– उत्सव काळातील बंद रस्ते व त्यांचे पर्यायी मार्ग यांचे मार्गदर्शन लाभेल.
– गणेश उत्सव काळातील शहरातील रिंगरोडची माहिती या मॅपवर असेल.
– उत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागातील अवजड वाहतूकीसाठी बंदी असलेले मार्ग यांची माहिती मिळू शकेल.
– तसेच उत्सव काळात गणेश मुर्ती विसर्जन घाटांची माहिती लोकेशनसह मिळणार.
जास्तीत जास्त नागरिकांना पुण्यातील गणेशोत्सव अनुभवणे सोईस्कर व्हावे यासाठी सारथी गणेश उत्सव गाईड लिंक व क्यू आर कोडची प्रसिद्धी सोशल मिडीया, वृत्तपत्र, सर्व वाहनतळ, बसस्थानके, रेल्वे स्थानके, खासगी ट्रॅव्हल्स थांबे, महत्वाचे चौक, गणेश मंडळे, शहरातील सर्व उपलब्ध एल.ई.डी. स्क्रिनवर या ठिकाणी बॅनर स्वरुपात लिंकची माहिती उपलब्ध केली जाईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांनी एका दिवसात फस्त केले ३० टन पेढे आणि मोदक
Pune News : पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती