Big Breaking News : पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून पळून गेल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात दोषी आढळलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ललित पाटीलच्या भावालादेखील अटक झाली. आता याप्रकरणी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या घटनेत राज्यसरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन अमली पदार्थ तस्कर ललित पाटील या आरोपीला नेमका कोणता आजार झाला होता. (Big Breaking News) नऊ महिने कोणत्या आजारावर उपचार सुरू होते. रूग्णालयात एवढी सुरक्षा यंत्रणा असताना देखील आरोपी कसा पळून गेला. या सर्व प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना असमाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर वॉर्ड क्रमांक १६ ची आमदार रविंद्र धंगेकर यांनी पाहणी केली. यानंतर माध्यम प्रतिनिधींसोबत धंगेकर यांनी संवाद साधला.
धंगेकर म्हणाले की, कोणताही रुग्ण रूग्णालयात अॅडमिट होतो, तेव्हा योग्य उपचार करून त्याला काही दिवसांत सोडून देण्यात येते. मात्र, ललित पाटील याला असा कोणता गंभीर आजार झाला होता, ज्यासाठी ९ महिने रूग्णालयात ठेवण्याची गरज होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ललित पाटील प्रकरणामध्ये कोट्यवधी रूपयांचे अर्थकारण झाले असणार आणि आरोपी पळून गेला आहे.(Big Breaking News) त्यामुळे या आरोपीवर उपचार करणार्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे. वॉर्ड क्रमांक १६ मध्ये १० ते १२ आरोपी उपचार घेत होते. पण ललित पाटील पळून गेल्यावर अनेक आरोपींना येरवडा कारागृहात सोडण्यात आले आहे. त्यामुळे खरच आरोपीवर उपचार सुरू होते का? हा प्रश्न निर्माण होतो. शिंदे गटातील एका मंत्र्यांचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार आहे.
याप्रकरणी डॉ. संजीव ठाकूर म्हणाले की, हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने अधिक माहिती देऊ शकत नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : आता आमदारांचे फेसबुक अकाउंट क्लोन; सायबर भामट्यांची करामत
BIG BREAKING NEWS : अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या तब्बल ३५ मुलांना मारहाण