Pune News : पुणे : सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरणार्थ रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्या मातांना देखील बाळाला स्तनपान करण्यात अडचणी येतात. त्यांना यासाठी वेगळी सुविधाही नसते. अखेर रेल्वे प्रशासनाने या अडचणीवर मार्ग काढत पुणे रेल्वे स्थानकावर स्वतंत्र ‘स्तनपान कक्ष’ सुरू केला आहे.
‘चाइल्ड हेल्प फाउंडेशन’ संस्थेच्या सहकार्याने सुविधा सुरू
महिला वर्गाची अडचण लक्षात घेऊन पुणे स्थानकात फलाट क्रमांक एकवर असलेल्या महिला प्रतीक्षा कक्षात शिशू स्तनपान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Pune News ) त्यासाठी प्रतीक्षा कक्षात स्वतंत्रपणे उभारण्यात आलेल्या खोलीत खुर्ची, टेबल, पंखा, दिवे यासह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत.
‘चाइल्ड हेल्प फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. महिलांना येथे सुरक्षित वाटावे, (Pune News ) यासाठी या खोलीस आतून आणि बाहेरून बंद करण्याची सोय आहे. या सुविधेमुळे आता स्थानकावर गाडीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या मातांसाठी मुलांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात स्तनपानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, (Pune News ) वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे स्थानकाचे संचालक मदनलाल मीणा यांच्या संयोजनात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘पीएमपी’ होतेय ‘स्मार्ट’; घरबसल्या कळणार बसचे लोकेशन
Pune News : कांदा प्रश्नी बाबा आढाव यांचे ठिय्या आंदोलन; तीव्र लढा उभारण्याचा इशारा