Pune News : पुणे : वाघोली (ता. हवेली) येथील जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि मॅनेजमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांच्या हस्ते रविवारी (ता.१) करण्यात आले आहे.
देशभरातील ३०० हुन अधिक खेळाडूंनी घेतला सहभाग
यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, आंतरराष्ट्रीय मास्टर व जागतिक अपंग बुद्धिबळ चॅम्पियन शशिकांत कुतवाल, जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि मॅनेजमेन्ट चे संचालक डॉ. आर.डी. खराडकर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (Pune News) तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी कॉलेज पुणेचे उपसंचालक डॉ.एन.बी.हुल्ले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. एन यू कोर्ड, भूषण श्रीवास आणि डॉ. निशिगंधा पाटील, आय.ए. अजिंक्य पिंगळे, एस.एस.सोमण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जी.एच.रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आणि कल्पना प्रकाश वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दशकांपासून नागपुरात बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. (Pune News) पुणे रायसोनी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेला हा पहिला कार्यक्रम आहे. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशभरातून ३०० हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात आयसीएफ चेन्नईचे जीएम आर आर लक्ष्मण, आयएम मोहम्मद नुबेर शेख, समेद शेटे, अनुप देशमुख, एफ एम हिमल गुसेन यांचा समावेश होता. (Pune News) एम.जी. गहान, निखिल दीक्षित आणि जे.रामकृष्ण अनेक फिडे रेट केलेल्या खेळाडूंमध्ये आयएम नुम्बेरशाह शेख यांना सर्वाधिक बिलिंग देण्यात आले. असून त्यानंतर आयएम समेद शेटे यांना स्थान देण्यात आले आहे.
आयए अजिंक्य पिंगळे हे मुख्य पंच आहेत ज्यांना आयए विनिता शोत्री, एफए जुईली कुलकर्णी, एफए अमित टेंफुर्णे, एफए प्राची मयेकर, एफए शुभम सोनी, एसएनए प्रेयस अंबाडे, एसएनए देवव्रत तिवारी, सागर साखरे, अंबाडे हे सहाय्य करत आहेत.
दरम्यान, या स्पर्धेचे आयोजन जी.एच.रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाऊंडेशन आणि कल्पना प्रकाश वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. (Pune News) या स्पर्धेला पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळ (PDCC), महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना (MCA), ऑल इंडिया चेस फेडरेशन (AICF) आणि FIDE यांनी मान्यता दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे ग्रामीण विभागात दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न
Pune News : बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये करवाई