Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथे ‘ईद-ए-मिलाद’ मोठ्या उत्साहात साजरा; शाही दरबार मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 October 2023, 17:51

विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर  : अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) सण हा यावर्षी एकाच दिवशी आल्याने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरुवारी (ता.२८) न काढता रविवारी (ता. १) काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती पारंपारिक पध्दतीने रविवारी (ता. १) मोठ्या उत्साहात साजरी केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील बागुल शहा वली दर्गा या ठिकाणापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. (Loni Kalbhor) यावेळी लोणी काळभोर गावातून मिरवणूक काढण्यात आली. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन या परिसरात मिरवणूक आली असता रमजान तांबोळी, इजाज खान, फिरोज मेटकरी, समीर खान, इरफान शेख, ताहीर शेख यांनी मिरवणुकीतील बांधवांना फळांच्या ज्यूस वाटप केले. तसेच आलेल्या प्रत्येक नागरिकाला गुलाबाचे फुल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

 

त्यानंतर ही मिरवणूक कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन येथून इंदिरानगर, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बागेतून पुन्हा बागुल शहा वली दर्ग्यापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी नमाज पठाण केले. सर्व उपस्थित बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. (Loni Kalbhor) या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी आलमगीर ट्रस्टचे रहिमान  इनामदार, फय्याज इनामदार, अफजल इनामदार, इम्रान शेख, मौलाना मेहबूब शेख, मौलाना गुलाम रब्बानी, मौलाना हसनेन रजा, हनीफ  रिजवी, आदम इनामदार, गफूरभाई शेख, ताहेर खान, आयाजभाई इनामदार, हाजी मुसाभाई तांबोळी, रशीद इनामदार आदि उपस्थित होते.

दरम्यान, ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण आहे. पवित्र ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीची तयारी मुस्लिम बांधवांनी जोरदार केली होती. (Loni Kalbhor) ईदनिमित्त ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या निमित्ताने धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहर व मुस्लिम मोहल्ल्यातील मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लिम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई केली होती.

पोलिसांचाही चोख बंदोबस्त

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, हनुमंत तरटे, पोलीस हवालदार रामदास मेमाणे. पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीसह पुणे-सोलापूर महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.

…म्हणून रविवारी ‘ईद-ए-मिलाद’ साजरा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मूर्तींची मोठी मिरवणूक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने लोणी काळभोर येथे ईद-ए-मिलाद रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

– नसीरखान पठाण, उपसरपंच, कदमवाकवस्ती

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor : ‘एक तारीख, एक तास, लोणी काळभोर बनवू खास’; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून गाव झाले स्वच्छ!

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठातील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा संपन्न

Loni Kalbhor : निरोगी हृदय राखणे ही सामायिक बांधिलकी : डॉ. सूरज इंगोले

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमधील अनिल पवार हत्या प्रकरणाचा महत्वपूर्ण निकाल; आरोपी बापू बाबरला जन्मठेप

Monday, 19 October 2026, 22:17

छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी दिलासा! पहिला हप्ता ३,५०१ रुपये प्रतिटन; संचालक मंडळाचा निर्णय

Monday, 19 October 2026, 21:50

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17
Next Post

Loni Kalbhor : लोणी कॉर्नरजवळ टेम्पो-पिकअपचा अपघात; अपघातानंतर टेम्पोमधील विटा रस्त्यावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp