Pune News : पुणे : नोकरीच्या आमिषातून तरुणाची तब्बल 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुणे शहरातील नारायण पेठेत राहणाऱ्या या तरुणाला पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवत सायबर चोरट्याने 16 लाखाला गंडा घातला आहे. (In Pune, a young man was cheated)
सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी मंदार सुभाष कार्यकर्ते (रा. नारायण पेठ, पुणे) या तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune News) त्यावरून अज्ञात मोबाईल क्रमांकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा नारायण पेठ राहण्यास असून तो नोकरीच्या शोधात होता. दरम्यान, त्यास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप क्रमांकावर पार्ट टाइम नोकरीसाठीचा मेसेज आला.(Pune News) त्यामध्ये टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून तक्रारदार तरुणास टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगितले.
त्यानंतर सुरुवातीला चांगला मोबदला देऊन या तरुणाचा सायबर चोरट्याने विश्वास पटल्यावर तरुणास ‘व्हीआयपी’ आणि ‘प्रीपेड टास्क’ या नावाखाली पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. (Pune News) आमिषाला बळी पडत तरुणाने सांगितल्याप्रमाणे एकूण १६ लाख ८७ हजार ६६० रुपये वेगेवेगळ्या बँकांमध्ये जमा केले. मात्र काही कालावधी उलटला तरी जमा केलेल्या पैश्यांचा मोबदला मिळत नसल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनतर टेलिग्राम ग्रुपमधून देखील काढण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारदार तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. पुढील तपास पोलीस करत आहेत.