Pune News पुणे : भूसंपादनाच्या बदल्यात जादा परतावा देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआय न्यायालयाने १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.(In case of taking bribe, Dr. Anil Ramod remanded to CBI custody till June 13; Cash of 6 crore 64 lakhs seized..)
घर व कार्यालयातून ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत
डॉ. रामोड यांच्या घर व कार्यालयातून सीबीआयने तपासादरम्यान ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. (Pune News ) तसेच त्यांच्या कार्यालयात एक सीलबंद आयफोन जप्त करण्यात आला आहे. तक्रारदार व आरोपी यांमध्ये झालेले संभाषण रेकॉर्ड झाले आहे.
त्यामध्ये डॉ. रामोड यांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहे. चौकशीसाठी डॉ. रामोड सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे.(Pune News ) त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी डॉ. रामोड यांना पाच दिवस सीबीआय कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अभय अरीकर यांनी केला. सीबीआयचे अतिरिक्त अधिक्षक आय. बी. पेंढारी यांनी डॉ. रामोड यांना न्यायालयात हजर केले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आषाढी वारीत मोबाईल चोरण्याचा कट पोलिसांनी उधळला; दोघांना ठोकल्या बेड्या…
Pune News : गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणास अटकपूर्व जामीन मंजूर
Pune News : पुण्यातील कर्वेनगरात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग! परिसरात धुराचे लोट