Pune News : पुणे: बंदी असलेले मेफेनटर्माइन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि “अन्न आणि औषध प्रशासना’च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली.(illegal sale of mephentermine; FDA and police raid on shops)
मंगेश पोपट नरूटे, (वय 33, रा. नऱ्हे आंबेगाव) असे आरोपीचे नाव असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक महेश साळुंखे यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
उंड्री येथील संगम मेडिकल येथे सुरू होती विक्री
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पेट्रोलिंग सुरू असताना उंड्री येथील संगम मेडिकल येथे मेफेनटर्माइन हे औषध विनापरवाना विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने ही माहिती त्वरित पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांना कळवली. थोपटे यांनी “अन्न आणि औषध प्रशासना’ला याबाबत माहिती देऊन त्यांना संबंधित ठिकाणी बोलवले.(Pune News) त्यानुसार “एफडीए’तील निरीक्षक विजय नांगरे आणि अतिश सरकाळे हे आले.
औषध देताना नरूटे या मेडिकल विक्रेत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर झडती घेतली असता, दुकानाच्या मागे मेफेनटर्माइन सल्फेट इंजेक्शन आठ आणि एकेअर गोळ्यांची दोन पाकिटे, जेस्टाप्रो गोळ्यांची पाच पाकिटे दिसून आली.
ज्या रुग्णांचा रक्तदाब कमी आहे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांच्या रक्तदाबाची पातळी राखण्यासाठी मेफेनटर्माइन दिले जाते. रक्तदाब कमी झाल्यास तो दुरूस्त करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. बॉडीबिल्डर्स आणि खेळाडू देखील याचा वापर करतात. (Pune News) यामुळे स्नायूंना बुस्ट मिळते. मात्र, या औषधांचे जेवढे सकारात्मक परिणाम औषधोपचारात आहेत. त्यापेक्षा जास्त दुष्परिणाम याचे व्यसन लागल्यावर आहेत. या औषधांच्या वापरामुळे उच्च रक्तदाब, चिंता, निद्रानाश आणि “सीएनएस’ (सेंट्रन नर्व्हस सिस्टिम) उत्तेजित होऊ शकते. मात्र, हे अत्यंत प्राणघातक देखील ठरू शकते.
-दिनेश खिंवसरा, सहाय्यक आयुक्त,अन्न आणि औषध प्रशासन, पुणे विभाग
काय आहे हे मेफेटरमाइन, ए केअर आणि जेस्टाप्रो टॅब्लेट?
मेफेनटर्माइन सल्फेट हे इंजेक्शन बॉडी बिल्डिंगसाठी तर ए केअर आणि जेस्टाप्रो या दोन गोळ्यांचा वापर हा गर्भपातासाठी केला जातो. मेफेनटर्माइन विक्रीला बंदी आहे. (Pune News) तर गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्याला बंदी आहे. जेस्टाप्रो आणि ए केअर याचा उपयोग हा लो ब्लडप्रेशर या आजारात केला जातो. तसेच त्याचा दुरुपयोग गर्भपातासाठी केला जातो. या औषधांचा उपयोग हा नोंदणीकृत गर्भपात केंद्रात केला जातो.
बॉडी बिल्डिंगनंतरही नशेसाठी वापर…
जिम प्रशिक्षक “मेफेनटर्माइन’ या उत्पादनाचा वापर बॉडी बिल्डर्सना प्री-वर्कआउट इंट्राव्हेनस इंजेक्शन म्हणून देण्यासाठी करतात. ते सुरुवातीला चरबी कमी करण्यासाठी आणि व्यायामासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही महिन्यांनी त्यांनी जिम करणे बंद केले तरी ते वापरतात. (Pune News) काही काळ ते घेतल्यानंतर ते उदासीन आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात. अल्कोहोल किंवा कोकेन यांचा जसा नशेमध्ये प्रभाव जाणवतो तोच बूस्ट या औषधात देखील मिळत असल्याने याचे व्यसन लागते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मानवतेसाठी धर्माधर्मांमध्ये संवाद वाढायला हवा : सबनीस
Pune News : पुण्यात तरुणाला नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल १६ लाखांची फसवणूक