Pune News : पुणे : तुझा मित्र आणि तू माझ्या बहिणीला का छेडले, असा जाब विचारत, एकावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन पर्वती परिसरात दहशत पसरवणाऱ्या संकेत देविदास लोंढे व त्याच्या ६ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ५३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
दांडेकरपूल येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळी प्रमुख संकेत देविदास लोंढे (वय-२०, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे), टोळी सदस्य (Pune News) प्रतीक उर्फ बिट्या पांडुरंग कांबळे (वय-२०, रा. चुनभट्टी, सिंहगड रोड, पुणे), अजित उर्फ आज्या संजय तायडे (वय-२०, रा. जनता वसाहत, पुणे), शुभम दिगंबर गजधने (वय-१९, रा. दांडेकर पुल, पुणे) तसेच तीन विधिसंघर्षीत बालकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, दांडेकर पुल येथील रामकृष्ण मठाजवळ फिर्यादी चालत असताना संकेत लोंढे, प्रतिक कांबळे, अजित तायडे, शुभम गजधने व इतर तीन अल्पवयीन मुले त्यांच्याजवळ आली. माझ्या बहिणीला का छेडले असे म्हणत, कॉलर पकडून मारहाण केली. (Pune News) त्यावेळी अल्पवयीन मुलाने धारदार हत्यार काढून भाई लोकांना शिवी देतो का, म्हणत गळ्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी राहत असलेल्या वसाहतीमध्ये जाऊन, कोयते हवेत फिरवून पोलिसांत तक्रार केली तर एक-एकाचा मर्डर करण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात आयपीसी ३०७, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी संकेत लोंढे याने मागील १० वर्षांत खुनाचा प्रयत्न, दुखापत, हल्ल्याची तयारी करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वारंवार याच प्रकारचे गुन्हे करत असल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ सुहेल शर्मा यांच्यामार्फत (Pune News) अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे करीत आहेत.
ही कामगिरी आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे, उप निरीक्षक जगदाळे, पोलीस अंमलदार दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली.