Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : बहिणीला छेडल्याच्या रागाने धारदार शस्त्राने गळ्यावर वार; आरोपीसह ६ साथीदारांवर ‘मोक्का’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 August 2023, 18:11

Pune News : पुणे : तुझा मित्र आणि तू माझ्या बहिणीला का छेडले, असा जाब विचारत, एकावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन पर्वती परिसरात दहशत पसरवणाऱ्या संकेत देविदास लोंढे व त्याच्या ६ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ५३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

दांडेकरपूल येथील घटना

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळी प्रमुख संकेत देविदास लोंढे (वय-२०, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे), टोळी सदस्य (Pune News)  प्रतीक उर्फ बिट्या पांडुरंग कांबळे (वय-२०, रा. चुनभट्टी, सिंहगड रोड, पुणे), अजित उर्फ आज्या संजय तायडे (वय-२०, रा. जनता वसाहत, पुणे), शुभम दिगंबर गजधने (वय-१९, रा. दांडेकर पुल, पुणे) तसेच तीन विधिसंघर्षीत बालकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, दांडेकर पुल येथील रामकृष्ण मठाजवळ फिर्यादी चालत असताना संकेत लोंढे, प्रतिक कांबळे, अजित तायडे, शुभम गजधने व इतर तीन अल्पवयीन मुले त्यांच्याजवळ आली. माझ्या बहिणीला का छेडले असे म्हणत, कॉलर पकडून मारहाण केली. (Pune News) त्यावेळी अल्पवयीन मुलाने धारदार हत्यार काढून भाई लोकांना शिवी देतो का, म्हणत गळ्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी राहत असलेल्या वसाहतीमध्ये जाऊन, कोयते हवेत फिरवून पोलिसांत तक्रार केली तर एक-एकाचा मर्डर करण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात आयपीसी ३०७, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

 

या गुन्ह्यातील आरोपी संकेत लोंढे याने मागील १० वर्षांत खुनाचा प्रयत्न, दुखापत, हल्ल्याची तयारी करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वारंवार याच प्रकारचे गुन्हे करत असल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ सुहेल शर्मा यांच्यामार्फत (Pune News) अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे करीत आहेत.

ही कामगिरी आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे, उप निरीक्षक जगदाळे, पोलीस अंमलदार दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : उत्सुकता…उत्साह अन् जल्लोष…विक्रम लँडरचे ‘मून लँडिंग’ यशस्वी; एमआयटी-एडीटीमध्ये चांद्रयान-३ च्या लँडिंगचा नेत्रदीपक सोहळा

Pune News : हात कापू का? तुला मेणबत्तीचे चटके देईन… कोथरूडमध्ये तीन वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षिकेचे असभ्य वर्तन

Pune News : हिंजवडी येथे ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Bhigwan News : चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचताच दत्तकला शिक्षण संस्थेत एकच जल्लोष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.