Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार करत उपमुख्यमंत्रीपद पटकावले. त्यानंतर अजित पवार यांना हवे असलेले अर्थ आणि नियोजन खाते देखील त्यांना मिळाले. त्यांना हे खाती देऊ नये, असा दबाव शिवसेनेकडून होता. परंतु अखेर त्यांना ती खाती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पटकावण्यासाठी वळवला. खाते वाटपानंतर पालकमंत्री पदावरुन पुण्यात शीत युद्ध सुरू होते. अखेर अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाले. मात्र, या पदावर विराजमान झाल्यानंतर आता शरद पवार गटाकडून त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागत आहेत. अजित पवार हे पालकमंत्री झाले असले तरी त्यांना भाजपाने अधिकारही द्यावेत, त्यानंतरच अजित पवार हे काम करू शकतील, असं खोचक विधान शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले आहे.
आता विकासाचे राजकारण करावे
भाजपला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे होते. त्याचवेळी अजित पवार पालकमंत्री नसतानाही पुणे जिल्ह्यातील अनेक बैठका घेत होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील नाराज होते. हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला. या वादात पुण्याचे पालकमंत्रीपद मिळत नसल्यामुळे अजित पवार नाराज होते. (Pune News) त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीस ते गेले नसल्याची चर्चा होती. त्यानंतर बुधवारी अजित पवार यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. अजित पवार हे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने, पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराची ताकद वाढली आहे.
आता या पदावरून त्यांना ऐकूनही घ्यावे लागत आहे. अजित पवार यांना पालकमंत्री पद मिळाले; परंतु भाजप त्यांना पालकमंत्री पदाचे अधिकार देणार नाही. (Pune News) पुणे महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपने केलेला भ्रष्टाचार देखील अजित पवार बाहेर काढू शकणार नाहीत, असा दावा शरद पवार गटाने केला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढल्याचा खोचक टोला ही शरद पवार गटाने लावला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी हा टोला लगावला आहे. व्यक्तिशः अजित पवारांना माझ्याकडून शुभेच्छा. (Pune News) अजित पवारांनी आता विकासाचे राजकारण करावे. वीस वर्षांपासून शहरात अनेक प्रलंबित प्रश्ने आहेत, ती मार्गे लावावीत. शहरातील अनधिकृत बांधकाम, पवना जलबंद प्रकल्प, रेडझोन, असे प्रश्न प्रलंबित आहेत, असेही कामठे म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या मालकीवरून पती-पत्नीमध्येच रंगला वाद
Pune News : सिंहगड रस्त्यावरील दुचाकी विक्री दालनाला भीषण आग