Pune News : पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा रेल्वे, एसटी बसचे आरक्षण मिळत नाही. खासगी बस प्रवास प्रचंड महागलेला असतो. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा येते. यामुळे यंदा गावी जाण्यास इच्छुक लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. सुट्यांसाठी पुणे स्टेशनवरुन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. विशेष रेल्वेपैकी एक गाडी संपूर्ण वातानुकूलित असणार आहे. या विशेष रेल्वेच्या २८ फेऱ्या असून, बुकींग सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. विशेष रेल्वेचे आरक्षण रविवार (ता. १५) ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे.
आरक्षण सुरू
ही गाडी या स्टेशनवर थांबणार आहे.
– १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान ०२१४१ ही विशेष गाडी दर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता पुणे स्टेशनवरुन सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता अजनी रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहचणार आहे.
– १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी ०२१४२ दर बुधवारी अजनी स्टेशनवरुन संध्याकाळी ७.५० वाजता सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहचणार आहे. (Pune News)
– पुणे-गोरखपूर ही सुपरफास्ट ट्रेन २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. ०१४३१ क्रमांक असलेली ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता पुणे स्टेशनवरुन सुटणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता गोरखपूरला ही रेल्वे पोहचणार आहे.
– गोरखपूरवरुन ०१४३२ क्रमांकाची ही विशेष गाडी २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर दरम्यान धावणार आहे. प्रत्येक शनिवारी रात्री ११.२५ वाजता गोरखपूरवरुन ही गाडी सुटणार आहे. (Pune News) ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.
– ०२१४१ आणि ०२१४२ ही गाडी संपूर्ण वातानुकूलित आहे. एकूण २० डबे असणारी ही गाडी पुण्यावरुन सुटल्यानंतर दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव, वर्धा येथे थांबेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ऑनलाइन टास्क देवून ९ लाखांचा ऑनलाइन गंडा; बिबवेवाडीत प्रकार; गुन्हा दाखल
Pune news : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष; तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार; कारवाईची मागणी