Pune News : पुणे : एचडीएफसी बँकेने वैयक्तिक सेवा देण्यासाठी नेमलेल्या इम्पेरिया रिलेशनशिप मॅनेजरने विश्वास संपादन करुन तब्बल १ कोटी ६५ लाख ८१ हजार ९११ रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Fraud Of 1 Crore 65 Lakh was done HDFC Bank’s Relationship Manager)
डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी एचडीएफसी बँकेचे रिलेशन मॅनेजर आकाश सिंह सुरेशसिंह राणा (रा. बाणेर, मुळ मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुवर्णा गुप्ते (वय ४९, रा. सिंगापूर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल अभियंता होते. ते १९९८ मध्ये निवृत्त झाले. फिर्यादी व त्यांची बहिण या विवाह झाल्यानंतर परदेशात स्थायिक झाल्या. फिर्यादी यांचे वडिल अरुण गुप्ते यांना एप्रिल २०१७ मध्ये न्युमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीला पटकन पैसा जमा करण्यात अडचणी आल्या. तेव्हा त्यांनी गुंतवणुकीमध्ये विविधता आणण्याचा निर्णय घेतला. जेणे करुन मासिक उत्पन्नाची खात्री मिळेल. त्यांनी गुंतवणुकीच्या मदतीसाठी एचडीएफसीच्या भंडारकर रोड शाखेशी संपर्क साधला. तेव्हा बँकेने आकाश सिंह याची रिलेशन मॅनेजर म्हणून नेमणूक केली. (Pune News) राणा याने त्यांच्या वडिलांना मुदत ठेवी व शेअर्समधील त्यांची वारसा गुंतवणुक काढूण्यास आणि म्युच्यूअल फंड आणि युनिट लिंक्ड विमा योजनेमध्ये पैसे हस्तातरीत करण्यास भाग पाडले.
त्यामुळे त्यांच्या वडिलांचे दीर्घ कालीन आर्थिक नुकसान झाले. कोवीड काळात लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्याने राणा याने त्यांच्या आईवडिलांच्या आर्थिक व्यवस्थापनावर पूर्णपणे ताबा मिळविण्याची संधी साधली.(Pune News) त्यांची जुनी गुंतवणुक बंद करण्यास भाग पाडून म्युच्यूअल फंडावर कर्ज घेऊन ओव्हर ड्राफ्ट खाते मार्फत इक्विीटी मार्केटमध्ये पुन्हा गुंतवणुक करण्यास भाग पाडले व मोठा सट्टा लावायला सुरुवात केली.
फिर्यादी यांच्या वडिलांचे नोव्हेबर २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांची बहिण अमेरिकेतून आली. तिने वडिलाचे आर्थिक व्यवहाराचा तपशील पाहिल्यावर तो जुळत नसल्याचे लक्षात आले.(Pune News) त्यानंतर हा अपहार उघड झाला. राणा याने त्यांच्या खात्यातील रक्कमा ज्यांच्याशी काही संबंध नाही, अशा लोकांच्या नावे वर्ग केल्या.
ओव्हर ड्राफ्ट खात्यातून एका कंपनीत मोठी रक्कम ट्रान्सफर केली. त्यांच्या आईवडिलाचे बँक डिटेल्स व नेटबँकिंग पीन, एटीएम पीन तसेच बँक व्यवहाराचे कामासाठी आवश्यक असल्याचे खोटे सांगून वेळोवेळी इंटरनेट बॅकिंगद्वारे व एटीएम तसेच चेकद्वारे प्रत्यक्ष ट्रान्जेक्शन करुन व रोख रक्कमा काढून १ कोटी ६५ लाख ८१ हजार ९११ रुपये रक्कमा काढून अपहार केला. (Pune News)
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ’उजास’ उपक्रमांतर्गत पथनाट्य सादर
Pune News : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच
Pune News : पुण्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमध्ये ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार