Pune News : पुणे : पुणे शहरासह परिसरात लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एका कर्मचाऱ्याला गुणपत्रिका देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून पैसे घेत असताना पकडल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. संघटनेने या कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी कुलगुरूंकडे केली आहे.
तातडीने कारवाई करण्याची कुलगुरूंकडे मागणी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कला शाखेत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याने गुणपत्रिका देण्यासाठी तीन हजार रुपये घेतल्याचा आरोप केला. (Pune News ) त्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंकडे केली.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभाविपचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला आहे. दरम्यान, (Pune News ) याबाबतची चित्रफित समाजमाध्यमात पसरली असून, विद्यापीठातील गैरकारभार यानिमित्ताने समोर आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह वडील जागीच ठार; चौघे गंभीर जखमी
Pune News : ”त्या” क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले तब्बल ३० लाख
Pune News : पीएमपीएमएलच्या खासगी चालकांचा अचानक संप, प्रवाशांचे हाल..