Pune News : पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) बस चालक आणि वाहकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करूनच कामावर उपस्थित रहा, असे आदेश पीएमपीएमएलतर्फे देण्यात आले आहेत.
‘पीएमपीएमएल’ बसेसच्या अपघाताचं प्रमाण वाढलं
मागील काही दिवसांपासून ‘पीएमपीएमएल’ बसेसच्या अपघाताचं प्रमाण वाढलं आहे आणि चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वाढतं आहेत. बसचे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ दरम्यान ५९ अपघात झाले होते. (Pune News) यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२३ मध्ये हा आकडा दुपटीने वाढला आहे. पीएमपीचे एकूण ७५ अपघात झाले. यात १९ जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या संख्येत आणि यात होणाऱ्या मृत्यूच्या आकडा दुपटीने वाढला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच आता बस चालक आणि वाहकांची ब्रेथ ॲनालायझर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात १७५० बसच्या माध्यमातून पीएमपीएमएलची सेवा दिली जाते. दररोज साधारण लाखो प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या कात्रजवरून बोपदेव घाटमार्गे भिवरी, गराडेमार्गे जाणाऱ्या बसला बोपदेव घाटाजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर चालकास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले होते.(Pune News) त्यानंतर सर्व आगारांमध्ये चालकांकडे बस देण्याअगोदर त्याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी करूनच बसची ड्यूटी द्यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच कामावर असताना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सुरुवातीला पीएमपीएमएल बस चालक आणि कंडक्टरची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी व्हायची मात्र काही दिवसांपूर्वी ही तपासणी होत नसल्याचं समोर आलं. नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या होत्या. (Pune News) त्यानंतर हा ब्रेथ ॲनालायझर तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चालक आणि वाहकांची नियमित तपासणी झाल्यास पीएमपी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आम्ही मांजरीचे भाई… म्हणत दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकरसह ५ साथीदारांवर ‘मोक्का’!