Pune News : पुणे : हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।। असे अभंग गात, सावळ्या विठुरायाच्या ओढीने लाखो वारकरी आपल्या दैनंदिन आयुष्यातील समस्या विसरून, तहान-भूक हरपून, मोठ्या भक्तीभावाने पायी वारी करतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ या वचनाचे पालन करत, लहान-थोर, गरीब-श्रीमंत हा भेदभाव विसरून भाविक विठू नामाच्या गजरात तल्लीन होतात.
हजारो वारकरी अपंगत्वावर, वेदनेवर मात करून पायी वारीचे व्रत नेमाने पाळतात. असाच एक वारकरी आपले अपंगत्व विसरून, पायी वारी पूर्ण करायचीच, असा चंग बांधून पुण्याहून पंढरीच्या दिशेने निघाला आहे. शरीराला अपंगत्व आले तरी विठ्ठलभक्ती सुटणार नाही, हाच संदेश जणू तो देत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच, अनेकांनी त्याच्या भक्तीभावाला सलाम केला आहे.
व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज (ता. १४) पुणे शहराचा पाहुणचार घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झाला. या प्रवासात संतश्रेष्ठ(Pune News) श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सासवड येथे जिल्ह्यातील ग्रामीणचा मुक्काम करणार आहे. तर जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणी काळभोर येथे मुक्कामी येणार आहे.
या पालखी सोहळ्यात विठुरायाच्या भेटीसाठी आतुरलेला एक अपंग भक्त पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. शरीराला अपंगत्व आले म्हणून काय झाले, विठूरायाच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी मी जिवाचे रान करेन, पण पंढरी गाठेनच, असा चंगच जणू त्याने बांधला आहे. ‘माझी जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥’ या संत ज्ञानदेवांच्या (Pune News) अभंगात म्हटल्याप्रमाणे पंढरीच्या वारीची आवड हीच आपल्या जिवीची आवड आहे असे सांगून, ‘भेटेन माहेरा आपुलिया।’ म्हणत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी खडतर प्रवास करीत निघालेला हा भक्त समस्त भाविकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.
या व्हिडिओमध्ये हा विठ्ठलभक्त उपयुक्त साहित्य एका बॅगमध्ये भरून, ती बॅग पाठीवर घेऊन पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. हात व पायाच्या सहाय्याने तो चालण्याचा प्रयत्न करीत आहे. (Pune News) या भक्ताने एक टोपी घातली असून, त्यावर माऊली… हा शब्द मोठ्या अक्षरात लिहिला आहे. ही टोपी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याहून वेगळी विठ्ठलभक्ती काय असू शकते, अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे पोलीस दलातील ‘ते’ पोलीस तडकाफडकी निलंबीत
Pune News : अनाथ मुलीला धमकावून पाच वर्षे बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना