Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अपंगत्व आले जरी, सुटली नाही विठ्ठल भक्ती…; अपंगात्वर मात करत भक्त निघाला पंढरपूरी!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 June 2023, 15:35

Pune News : पुणे : हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।। असे अभंग गात, सावळ्या विठुरायाच्या ओढीने लाखो वारकरी आपल्या दैनंदिन आयुष्यातील समस्या विसरून, तहान-भूक हरपून, मोठ्या भक्तीभावाने पायी वारी करतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ या वचनाचे पालन करत, लहान-थोर, गरीब-श्रीमंत हा भेदभाव विसरून भाविक विठू नामाच्या गजरात तल्लीन होतात.

हजारो वारकरी अपंगत्वावर, वेदनेवर मात करून पायी वारीचे व्रत नेमाने पाळतात. असाच एक वारकरी आपले अपंगत्व विसरून, पायी वारी पूर्ण करायचीच, असा चंग बांधून पुण्याहून पंढरीच्या दिशेने निघाला आहे. शरीराला अपंगत्व आले तरी विठ्ठलभक्ती सुटणार नाही, हाच संदेश जणू तो देत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच, अनेकांनी त्याच्या भक्तीभावाला सलाम केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज (ता. १४) पुणे शहराचा पाहुणचार घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झाला. या प्रवासात संतश्रेष्ठ(Pune News)  श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सासवड येथे जिल्ह्यातील ग्रामीणचा मुक्काम करणार आहे. तर जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणी काळभोर येथे मुक्कामी येणार आहे.

 

या पालखी सोहळ्यात विठुरायाच्या भेटीसाठी आतुरलेला एक अपंग भक्त पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. शरीराला अपंगत्व आले म्हणून काय झाले, विठूरायाच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी मी जिवाचे रान करेन, पण पंढरी गाठेनच, असा चंगच जणू त्याने बांधला आहे. ‘माझी जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥’ या संत ज्ञानदेवांच्या (Pune News) अभंगात म्हटल्याप्रमाणे पंढरीच्या वारीची आवड हीच आपल्या जिवीची आवड आहे असे सांगून, ‘भेटेन माहेरा आपुलिया।’ म्हणत विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी खडतर प्रवास करीत निघालेला हा भक्त समस्त भाविकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.

या व्हिडिओमध्ये हा विठ्ठलभक्त उपयुक्त साहित्य एका बॅगमध्ये भरून, ती बॅग पाठीवर घेऊन पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. हात व पायाच्या सहाय्याने तो चालण्याचा प्रयत्न करीत आहे. (Pune News) या भक्ताने एक टोपी घातली असून, त्यावर माऊली… हा शब्द मोठ्या अक्षरात लिहिला आहे. ही टोपी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याहून वेगळी विठ्ठलभक्ती काय असू शकते, अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुणे पोलीस दलातील ‘ते’ पोलीस तडकाफडकी निलंबीत

Pune News : महाराष्ट्राच्या रक्तातच गद्दारी आहे… सुप्रिया सुळेंच्या “त्या” व्हिडीओवरून भाजप-राष्ट्रवादीत ट्विटर वॉर

Pune News : अनाथ मुलीला धमकावून पाच वर्षे बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जळगाव घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ‘ग्रामपंचायत अधिकारी युनियन’चा भव्य मूक मोर्चा! पुणे जिल्हा परिषदेपासून कलेक्टरेटपर्यंत एल्गार, ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्कार कायम..

Tuesday, 1 September 2026, 17:24

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52
Next Post

Pachgani News : महाबळेश्वर अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी भरती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp