Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 1 September 2026, 16:25

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील आमदार आणि नगरसेवकांना आपल्या गटात घेण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर विभागप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. आगामी दसरा मेळाव्याच्या तयारीसह पक्षातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

या बैठकीदरम्यान दादर-माहिमचे आमदार महेश सावंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’बाबत पक्षाला माहिती दिल्याचा दावा केला. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले काही नेते किंवा कार्यकर्ते सध्या ठाकरे गटातील आमदार आणि नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सावंत यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सावंत यांनी सांगितले की, काही व्यक्ती आमदार आणि नगरसेवकांना फोन करून संपर्क साधत आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती देण्यात आली असून, अशा प्रकारचे फोन किंवा संदेश आल्यास त्यांची नोंद आणि रेकॉर्डिंग करून ठेवण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे गटातील एकही आमदार किंवा नगरसेवक पक्ष सोडणार नसल्याचा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला. पक्षात फूट पाडण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा चर्चा पसरवल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.

 

दरम्यान, बैठकीत मतदारयादी आणि एसआयआर प्रक्रियेबाबतही सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आगामी दसरा मेळाव्याच्या तयारीलाही बैठकीत महत्त्व देण्यात आले. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी ठाकरे गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला असल्याचे सावंत यांनी सांगितले.

आपल्या माहितीनुसार, सध्या ठाकरे गटाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाने शिवाजी पार्कसाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यास परवानगी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटानेही पक्षांतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात या राजकीय दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19
Next Post

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट 'MBBS'ला प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp