Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेत डोळ्यांची साथ सुरु झाली आहे. मुलांच्या बुबुळांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. साथीचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या चार दिवसांत रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची त्रेधातिरपीट उडाली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि जिल्हा शल्य चिकित्सकाटी टीम आळंदी येथे जाणार आहे. साथ आटोक्यात न आल्यास शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभाग प्रशासनाला देणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अवघ्या चार दिवसांत या साथीच १५६० रुग्ण या परिसरात आढळले आहेत.
अवघ्या चार दिवसांत १५६० रुग्ण आढळले
आळंदीतील विविध संस्थानांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये गेल्या चार दिवसांपासून डोळ्यांच्या साथीचा मोठा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. चार दिवसांत तब्बल १५६० रुग्ण साथीमुळे बाधित झाले आहेत. (Pune News ) या आजाराचे सोमवारी ४५० रुग्ण आढळले. त्यानंतर मंगळवारी ही संख्या जवळपास दुप्पट झाली. ७४० नवे रुग्ण आढळले. बुधवारी रूग्णसंख्या २१० झाली. तर गुरुवारी १६० रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे पथक आणि जिल्हा शल्य चिकित्सक आळंदी येथे घटनास्थळी तत्काळ भेट देणार आहेत. आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर आणि जवळच्या ग्रामपंचायतींमध्ये तपासणी मोहिम सुरु झाली असून, सर्व घरांची तपासणी केली जात आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News ) सर्व मुलांवर उपचार मोफत केले जात आहेत.
दरम्यान, रूग्णसंख्येत वाढ दिसल्यास शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांना खूषखबर; आता “या” नव्या शहरांमध्येही विमाने उडणार
Pune News : एनडीए बॉंबने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून बेड्या