Pune News : पुणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे आणि नगर परिसरातील व्हीआयपीएस ग्रुप- ग्लोबल ॲफिलिएट बिझनेस या खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयांवर शनिवारी छापे कारवाई केली. या कारवाईत तब्बल १८ कोटी ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (ED raids offices of ‘VIPS’ group; Pune, action in the city, assets worth Rs. 18 crore 54 lakh seized)
रक्कम हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय
या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये घेतले असून, ही रक्कम हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय ‘ईडी’ने व्यक्त केला आहे. (Pune News) व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल ॲफिलिएट वित्तीय संस्थेचा प्रमुख विनोद खुटे सध्या दुबईत वास्तव्यास आहे.
खुटे याने गुंतवणूकदारांना त्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी ‘ॲप’चा वापर केला आहे.
या ॲपचे नाव ‘ग्लोबल ॲफिलेट बिझनेस’ असे आहे. खुटे याने त्याच्या योजनेत अन्य गुंतवणूकदारांना सहभागी करून घेतल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. अशा पद्धतीने त्याने १२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. (Pune News) खुटे याच्या विरुद्ध ‘फेमा’ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) कायद्यान्वये ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुार, आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने खुटे याने गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये घेतले आहेत. (Pune News) ही रक्कम त्याने हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मेफेनटर्माइनची अवैध विक्री; दुकानांवर एफडीए आणि पोलिसांची धडक कारवाई
Pune News : मानवतेसाठी धर्माधर्मांमध्ये संवाद वाढायला हवा : सबनीस
Pune News : पुण्यात तरुणाला नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल १६ लाखांची फसवणूक