Pune News : पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यातील नीरा ते लोणंद या स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इतकेच नाहीतर या मार्गावर रेल्वे गाडीची प्रति तास 117 किमी वेगाची चाचणीही घेण्यात आली. त्यामुळे या मार्गावर आता गाड्या सुसाट धावणार आहेत.
इतर भागातही दुहेरीकरणाचे कार्य वेगाने सुरू
पुणे-मिरज या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम सुरु झाल्यापासूनच कामाने वेग घेतला आहे. हा रेल्वे मार्ग 279.05 किमी लांबीचा असून, (Pune News) या रेल्वे मार्गावर आतापर्यंत 174,68 किमी दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यात पुणे ते शिंदवणे, आंबळे ते राजेवाडी, दौंडज ते वाल्हा, शेणोली ते भवानीनगर, भवानीनगर ते ताकारी, ताकारी ते किर्लोस्करवाडी, सातारा ते कोरेगाव, पळशी ते जरंडेश्वर, नांद्रे ते भिलवडी, नांद्रे ते सांगली यांचा समावेश आहे. इतर भागातही दुहेरीकरणाचे कार्य वेगाने सुरू आहे.
नीरा ते लोणंद रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची पाहणी केली.(Pune News) हा मार्ग ७.६४ किलोमीटर लांबीचा आहे. या पाहणीनंतर त्यांनी या मार्गावर गाड्या चालविण्यास संमती दिली. त्यामुळे नीरा-लोणंद या दरम्यान आता दोन्ही मार्गांवरून रेल्वे वाहतूक होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रिक्षा, कॅबचालकांनी बंद पुकारताच, आरटीओ अॅक्शन मोडवर
Pune News : हडपसरमध्ये उभारणार श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा; महापालिकेचा पुढाकार
Pune News : सिमेंटच्या ब्लॉकने वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला; लष्करी जवानाला अटक