Pune News : पुणे : हिंमत आणि इच्छाशक्ती माणसाला कठीण प्रसंगातून तारून नेते. जगण्याची उमेद वाढवते आणि एक नवे आयुष्य फुलत जाते. याचे जीते जागते उदाहरण म्हणजे तळेगाव (जि. पुणे) येथील गौतम राठोड. आयुष्यात स्थिर-स्थावर होण्याच्या वयात अर्थात वयाच्या चाळीशीत त्यांना दुर्धर अशा कर्करोगाचे निदान झाले. या आजारपणात त्यांची एक किडनी पूर्णपणे निकामी झाली. सततच्या आजारपणामुळे उदरनिर्वाहाचे साधन असलेला वीस वर्षे रूजलेला व्यवसाय नाईलाजास्तव बंद करण्याची नामुष्की ओढवली. सामान्य माणूस मानसिकदृष्ट्या खचून जाईल, अशा अवस्थेतून जात असतानाही हिंमत न हरता राठोड यांनी नव्याने उभारी घेण्याचा निश्चय केला अन् घरातच केसर शेती फुलवण्याचा एक आगळा-वेगळा प्रयोग सत्यात उतरवला. राठोड यांची कमालीची इच्छाशक्ती आणि धाडसाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
राठोड यांच्या इच्छाशक्ती आणि धाडसाचे जिल्ह्यात कौतुक
गौतम राठोड यांनी २० वर्षे गॅरेज आणि मेकॅनिकल क्षेत्रात काम केले. आयुष्य सुरळीत सुरू असतानाच एका टप्प्यावर किडनीत गाठ आली. (Pune News) सर्व तपासण्या केल्यानंतर किडनीतील गाठ कर्करोगाची असल्याचे समजले. त्यातच किडनी निकामी झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील कसोटीचा काळ सुरु झाला. आजारपणामुळे ते शारीरिकदृष्ट्या खचले. मात्र, मानसिकदृष्ट्या खंबीर होते. पुन्हा उभारी घेण्याचे स्वप्न त्यांनी उराशई बाळगले.
राठोड यांना बागकामाची आवड होती. त्याचवेळी एका नातेवाईकांनी त्यांना केसर शेतीसंदर्भातील माहिती असलेला व्हिडीओ पाठवला. तो व्हिडीओ पाहून त्यांनी घरातच केसर शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पूर्ण अभ्यास करून आवश्यक माहिती संकलित केली. (Pune News) त्यानंतर त्यांनी एरोफोनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. व्हर्टीकल फार्मिंग पद्धतीने त्यांनी ही केसर शेती फुलवली आहे.
या शेतीच्या माध्यामातून दरवर्षी अर्धा किलो केसरचे उत्पादन घेतले जाते. एक ग्रॅम केसरची किंमत सातशे ते आठशे रुपये आहे. एका हंगामात किमान तीन वेळा उत्पादन घेतले जाते. (Pune News) याच शेतीच्या माध्यमातून ते आज लाखो रुपये कमवत आहेत. आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे… असे म्हटले जाते. याच काव्यपंक्ती राठोड यांनी कर्तव्याच्या जोरावर सत्यात उतरवल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे नगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; चौघे जखमी
Pune News : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; जळगावातील चोरट्यांना पुण्यात सापळा रचून अटक