Pune News : पुणे : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात आयोजिलेल्या ‘प्री इंडिपेंडेंस डे’कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील फ्रिक सुपर क्लब येथे ही घटना घडली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर क्लबमध्ये ‘प्री इंडिपेंडेंस डे’ कार्यक्रम सुरू होता. या वेळी मुझिकल कॉन्सर्ट दरम्यान एका गायकाने मंचावर गाणे सादर करत असताना हातातील देशाचा तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावला. (Pune News) यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. याबाबतची तक्रार अॅड. आशुतोष भोसले यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे.
उमा शांती नावाच्या कलाकाराने ‘शांती पीपल’ नावाच्या म्युझिकल बँडकडून गाणे सादर करत असताना हातात भारताचा तिरंगा घेतला होता. (Pune News) सादरीकरणाच्या वेळेस तिने देशाचा झेंडा हातात फिरवून समोर असलेल्या ऑडियन्समध्ये फेकून दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी भोसले यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे. (Pune News) याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुंढवा पोलिसांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : संतापजनक! रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल